डोंबिवलीत
मनसेने फोडली प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन दहीहंडी फोडली
डोंबिवली :- ( शंकर जाधव ) देशभरात इव्हिएम
मशिन वापरावर प्रचंड नाराजी पसरली आहे.आगामी विधानसभा निवडणुकित मतदानासाठी
इव्हिएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी अनेक राजकीय
पक्षांकडून होत आहे. यंदा अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगली
आणि कोकणात नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने
यंदा नवनिर्माण दहीहंडी करणार नाही असा निर्णय घेतला. मनसैनिकांनी मानपाडा रोडवर
प्रतीकात्मक इव्हिएम मशीन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि
मनसैनिकांमध्ये झटापत झाली. पोलिसांनी प्रतीकात्मक
ईव्हीएम मशीन दहीहंडी जप्त करण्याचा प्रयत्न केला मात्र
मनसैनिकांनी प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन दहीहंडी फोडली.
यावेळी मनसैनिकांनी मोदी सरकार हाय- हाय अश्या
घोषणाबाजी केली. मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम,गटनेते मंदार हळबे, डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा
पाटील, सागर जेथे, विजय शिंदे, दीपिका पेंडणेकर, प्रथमेश थोरात यासह अनेक पदाधिकारी
उपस्थित होते. यावेळी मनसैनिकांनी `ईव्हीएम हटाव ,
लोकशाही बचाव ` असे
लिहिलेले टीशर्ट परिधान केले होते.
Post a Comment