शिवसैनिकाच्या पुढाकाराने बुजले  रस्त्यातील खड्डे  ..

 डोंबिवली :- ( शंकर जाधव ) अतिवृष्टीने रस्त्यात खड्डे पडले असून ह्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अश्या वेळी पालिका प्रशासन कमी पडत असताना डोंबिवलीतील शिवसेना शाखाप्रमुख अजय घरत यांनी पुढाकार घेऊन रस्त्यातील खड्डे बुजवण्यास मदत झाली.डोंबिवली पूर्वेकडील टिळक पुतळ्याजवळ सुयोग मंगल कार्यालयासमोरील ररस्त्यावर पडलेले खड्डे रॅबिटने नागरिकांच्या मदतीने बुजवल्याने या शिवसैनिकाचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींनीकडून कौतुकाची थाप मिळाली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

     घरातील काम करताना रॅबिट रस्त्याच्या कडेला टाकला जातो. मात्र हे रॅबिट रस्त्यातील खड्ड्यात टाकले तर तात्पुरते का होईना रस्त्यावर खड्डे बुजतील.त्यासाठी  शिवसेना शाखाप्रमुख यांनी काही नागरिकांनी त्याच्या घरातील रॅबिट रस्त्याच्या कडेला न टाकता ते डोंबिवली पूर्वेकडील टिळक पुतळ्याजवळ सुयोग मंगल कार्यालयासमोरील ररस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यास सांगितले. नागरिकांनी यास होकार देत सदर रस्त्यातील खड्ड्यात रॅबिट टाकले.याबाबत अजय घरत यांना विचारले असता ते म्हणाले, पालिका प्रशासन कमी पडले म्हणून आपण शांत बसणे योग्य नाही, त्यासाठी आपण जागरूक नागरिक म्हणून पुढे येऊन आपल्या परीने हे काम करणे आवश्यक आहे.दरम्यान आता पालिका प्रशासनाने डोंबिवलीतील काही रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post