माजी परराष्ट्रमंत्री व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना डोंबिवलीत श्रद्धांजली...
डोंबिवली ( शंकर जाधव) माजी परराष्ट्रमंत्री व भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे दुखःद निधन झाल्याने देशात शोककळा पसरली आहे. डोंबिवली पूर्वेकडील भाजप जनसंपर्क कार्यालयात संध्याकाळी ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यमंत्री तथा कल्याण जिल्हा अध्यक्ष रविंद्र चव्हाण , माजी मंत्री तथा भाजपा जेष्ठ नेते जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, शशिकांत कांबळे, डोबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिडवाडकर सर्व प्रमुख कार्यकर्ते व नगरसेवकांनी श्रध्दांजली वाहिली.
Post a Comment