डोंबिवली : ( शंकर जाधव ) समाजसेवेत वाहून घेतलेल्या डोंबिवलीतील जितेंद्र अमोलकर आणि श्रीधर सुर्वे यांना कोटा प्राईड अचिव्हमेंट अवॉर्ड २०१९ ने सन्मानित करण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी राजस्थान येथील , कोटा येथे हॉटेल युकेएस येथे हा भव्य कोटा प्राईड अचिव्हमेंट अवॉर्ड २०१९ पार पडला. या सोहळ्यात १०१ जणांचा सन्मान करण्यात आला. यात डोंबिवलीतील दोन समाजसेवकांचा समावेश आहे. या सोहळ्यात रिमझिम ब्युटीपार्लर ची फाऊंडर रेखा स्वामी यांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते भव्य ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार आला. अमोलकर आणि सुर्वे हे समाजसेवेत उल्लेखनीय काम करत असून यांचा हा सम्मान म्हणजे सर्व डोंबिवलीकरांचा सन्मान आहे असे त्यांनी सांगितले.
डोंबिवलीतील जितेंद्र अमोलकर आणि श्रीधर सुर्वे यांना कोटा प्राईड अचिव्हमेंट अवॉर्ड २०१९ ने सन्मानित..
mumbaidateline24
0
Post a Comment