भाजप- शिवसेनेमुळे डोंबिवलीतील ८४० कुटुंब घरापासून वंचित राहिल्याचा आरोप..

रेल्वे प्रशासनाकडून हिरवा सिग्नल ... सत्ताधाऱ्यांची `चाल`ढकल..
 
 डोंबिवली :- दि. १९ ( शंकर जाधव )  जेएनपीटी ते दिल्ली या मालवाहू रेल्वे मार्गातील( फ्रेट काँरिडार ) प्रकल्पासाठी भूसंपादनामुळे बाधित झालेले ८४० कुटुंबीय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडे २००९ ते २०१९ असे दहा वर्ष हक्काचे घर मिळावे म्हणून संघर्ष करत आहेत.रेल्वे प्रशासनाने या बाधितांना घरे देण्यास हिरवा सिग्नल दिला आहे. राज्य शासनानेहि याला होकार दिला आहे. या प्रकल्पबाधितांना शासनाच्या योजनेतील बीएसयूपी प्रकल्पात असलेल्या इमारतीत घरे देण्यास राज्य सरकारने पालिका प्रशासनाला कळवले आहेत. मात्र अनेक वर्ष पालिकेत भाजप- शिवसेनेची सत्ता असताना केवळ `चाल`ढकलीचे राजकरण होत असल्याने ८४० कुटुंब घरापासून वंचित राहिले असल्याचा आरोप बाधितांनी मेळाव्यात केला.या बाधीतांना हक्काची घरे मिळवण्यासाठी मनसेचे जिल्हाअध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर हे बाधितांना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
      गावदेवी संघर्ष समिती आणि सुर्या सेवा संस्थेच्या वतीने डोंबिवलीतील जेएनपीटी ते दिल्ली या मालवाहू रेल्वे मार्गातील( फ्रेट काँरिडार )  बाधितांचा मेळावा डोंबिवली  पश्चिमेकडील रेतीभवन सभागृहात पार पडला.यावेळी मनसेचे जिल्हाअध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर, श्रीकांत वारंगे,  दिनेश गुरवमनसे शाखा अध्यक्ष नंदकिशोर भोसलेसूर्या सेवा संस्थेचे अध्यक्षकैलास गोंधळेकरगावदेवी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुर्यकांत लाड आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रकाश भोईर म्हणाले, कल्याण डोंबिवली महापालिका  महासभेच्या  पटलावर रेल्वे फ्रेट काँरिडार  बाधितांचे बीएसयुपीच्या इमारतीत पुनर्वसन हा विषय यायला हवा होता. परंतु तो घेण्यात आला नाही. आता रेल्वेच्या वतीने उपयुक्तेचे काम  बाधितांच्या जागांवर  सुरु करण्यात येणार आहे.तर कैलास गोंधळेकरम्हणाले, आम्हाला घरे देण्यास सत्ताधारी पक्षांनी लवकर निर्णय घेतला नाही तर कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढू, आंदोलने करू अस  इशारा दिला. निवडणुका आल्याने राजकारण्यांच्या अमिषाला बळी पडू नका असा सल्ला या मेळाव्यात ( फ्रेट काँरिडार )  बाधितांना देण्यात आला.तर श्रीरंग वारंगे म्हणाले कि,आम्ही फ्रेट काँरिडारचे प्रकल्प बाधित कल्याण डोंबिवली पालिकेचे करदाते नागरिक आहोत. पालिकेकडे आमचे पालकत्व आहे.मात्र स्थानिक प्रशासन आमचा हक्क डावलत आहे. आमची समस्या  पालिकेने सोडवावी अन्यथा पालिकेवर मोर्चा आयोजित करावा लागेल.बीएसयुपीच्या सदनिकांमध्ये आमच्या पुनर्वसन बाबतचा विषय पालिकेत चार महिने रेंगाळत आहे.महासभेच्या पटलावर हा विषय येणे गरजेचे आहे.हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.प्रकाश भोईर यांनी सातत्याने रेल्वे पालिका प्रशासनाकडे बाधितांच्या पुनर्वसनासाठी शर्थीने पाठपुरावा सूरु ठेवला आहे.

चौकट
चार वर्षानंतर शिवसेनेच्या नगरसेवक राजेश मोरेंना बीएसयूपी लाभार्थ्यांची आठवण..

सभागृहात कधी नव्हे ते आता शिवसेना नगरसेवक राजेश मोरे यांना अचानक दत्तनगर येथील बीएसयूपी लाभार्थ्यांची आठवण कशी झाली असा प्रश्न मनसे जिल्हाध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी यावेळी उपस्थित केला.रेल्वे प्रक्लापातील बधीताना घरे मिळावी म्हणून राजकरण न करता त्यांनी यांच्यासाठी सभागृहात आवाज उठवायला हवा होता. मात्र सभागृहात हा विषय घेतला जात नाही यामागे षड्यंत्र असावे. आता आगामी विधानसभेची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागू होईल.म्हणजे अजून काही महिने  हा विषय सभागृहात येणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post