आधी डोंबिवली पालिकेने स्वच्छ ठेवावे मग दंड आकारा...
डोंबिवलीकरांचा दंड भरण्यास नकार...
डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वच्छता मार्शल नेमणूक केली असून दोन दिवसांपासून शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांकडून दंड आकाराला जात आहे.मात्र सोमवारी डोंबिवलीकरांनीच या स्वच्छता मार्शलला ' आधी डोंबिवली शहर पालिकेने स्वच्छ ठेवावे मग दंड आकारावा असा सल्ला दिला.तसेच काही नागरिक आणि स्वच्छता मार्शल यांची स्टेशनबाहेरील परिसरात बाचाबाची झाली.तसेच दंड भरण्यास नकार दिला.या घटनेचा व्हीडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केला असून आता स्वच्छता मार्शलला डोंबिवलीकरांकडून दंड वसूल करण्यास खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
Post a Comment