बसपाच्या वतीने डोंबिवलीत ध्वजारोहण...


 डोंबिवली : ( शंकर जाधव  ) बहुजन समाज पार्टीच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील एस.के. पाटील शाळेजवळील चौकात प्रदेश महासचिव तथा खजिनदार दयानंद किरतकर यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर घाडगे, सूर्यवंशी बसपाचे डोंबिवलीतील पदाधिकारी सुरेश कुशाळकर, शंकर दयाल, रवी बागुल, मधुकर बनसोडे, सुनील चव्हाण आदिसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दयानंद किरतकर यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तसेच पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने  लवकरात लवकर मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी किरतकर यांनी केली. 

Post a Comment

Previous Post Next Post