डोंबिवली : ( शंकर जाधव ) स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप नगरसेवक साई ( स्नेहल ) शेलार यांच्या हस्ते शेलार चौकातील इंदिरा नगर येथील कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका शिल्पा शेलार, भाजप युवा आघाडीचे सिद्धार्थ शेलार, भाजपा डोंबिवली शहर उपाध्यक्ष राजू शेख, रवीसिंग ठाकूर, दिलीप भंडारी, कपिल शर्मा, कृष्णा गट्टू, श्रीरंग कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नगरसेवक साई ( स्नेहल ) शेलार स्वातंत्र्य दिनाच्या शुभे दिल्या. अतिवृष्टीने कोल्हापूर आणि सांगली येथ पूरपरिस्थितीत ज्यांना जीव गमवावा लागला त्या दुर्दैवी नागरिकांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.
Post a Comment