डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कोपर पुल बंद होणार असल्याचे पाश्वभुमिवर कोपर पूल ते ठाकुर्ली समांतर रस्ता वाहतुकीसाठी अडथळा दूर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहराच्या वतीने `ह`प्रभाग क्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांना पत्र देण्यात आले. फुटपाथ रिकामे करून नागरिकांना वापरण्याचे आवाहन करण्यात आले, तसेच वहातूक विभागाला वहातूक नियंत्रण करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी विरोधी पक्षनेते, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, शहर सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष श्रीकांत वांरंगे, विजय शिंदे, संदिप (रमा) म्हात्रे उपस्थित होते.
कोपर पूल ते ठाकुर्ली समांतर रस्ता वाहतुकीसाठी अडथळा दूर करण्याची मनसेची मागणी
mumbaidateline24
0
Post a Comment