विकासक वापरतोय महापालिका भूखंडावरील भरावाची माती


 डोंबिवली :-  ( शंकर जाधव  )         महापालिकेच्या आरक्षित असलेल्या भूखंडावर महापालिकेने मातीचा भरणा केला आहे. मात्र या भूखंडावर केलेली भरणा जेसीबी आणि ट्रकच्या सहाय्याने  एक खाजगी विकासक घेऊन जातो. आणि या मातीचा वापर त्याने खरेदी केलेल्या जागेवरती भराव म्हणून करत आहे. या घटनेकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
 टिटवाळा - मांडा येथे देवी मंदीर परिसरात मधुबन सोसायटीच्या बाजुलाच हा भूखंड आहे. या भूखंडाचा सव्र्हे क्रमांक १४२ असा आहे. हा भूखंड एमएसीबीला देण्यात येणार आला आहे. मात्र एमएससीबीने हा भूखंड अद्याापही ताब्यात घेतलेला नाही. या भूंखंडावर पालिका प्रशासनाने मातीचा भराव टाकला होता. विकासक ही माती ट्रकच्या सहाय्याने स्वत:च्या भूखंडावर वापरत असून भूखंडाची चोरी करत असल्याचा आरप नागरिकांनी केली आहे.  ही माती महापालिकेच्या तिजोरीतून भूखंडावर टाकली आहे. माहापालिकेच्या तिजोरीत खणखणाट असून हे पैसे नागरिकांनी भरलेल्या टॅक्सचे असल्याने कोणत्याही विकासकाला किंवा एखाद्याा व्यक्तीला अशा प्रकारची शासनाची मलमत्ता वापरता येता नाही असा नियम आहे. हा नियम डावलून ही माती घेऊन जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या संदार्भात पालिका अधिकारी सुधीर मोकल यांनी असे काही आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले 

Post a Comment

Previous Post Next Post