डोंबिवली : ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील अनधिकृत बांधकामाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या अग्यार समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेतील तब्बल ४१ लोकप्रतिनिधी व अधिकार्या विरोधात ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटिसा देण्यात आली होती. या पैकी ११ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी कारणे दाखवा नोटीसीला उत्तरच दिले नसल्याने पालिका आयुक्तांनी या ११ अधिकारी व लोकप्रतिनिधींना आपली बाजू मांडण्यासाठी शेवटची संधी देण्यासाठी वृत्तपत्रातून जाहीर नोटीस बजावली असून येत्या सात दिवसात नोटीसीला उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल असे पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नोटीसीद्वारे जाहीर केले आहे .
कल्याण डोंबिवली महानगर पालिका अनधिकृत बांधकामाची बजबजपुरी म्हणू ओळखली जाते असून या पालिकेत लाखोंहून अधिक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या असल्याने या बेकायदा बांधकामां संदर्भात सन २००४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या चौकशी संदर्भात अहवाल सादर करण्यासाठी निवृत्त न्यायाधिश अग्यार यांची एक सदस्यीय समितीची स्थापना केली होती.प्रदीर्घ दहा वर्षांच्या कालावधी नंतर अग्यार समितीने पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणी पालिकेतील लोकप्रतिनिधी,बांधकाम व्यावसायिक,वास्तुविशारद,व पालिका अधिकार्याचा समावेश असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे . सदरचा अहवाल शिफारशींसह राज्य सरकारला सादर केला आहे .पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामा बाबत पालिकेतील तब्बल ४१ अधिकाऱयांना विरोधात ठपका ठेवण्यात आला असून त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संबधित प्रशासनाला आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्याचे आदेशीत केल्याने पालिका आयुक्तानी दोषारोप ठेवलेल्या ४१ लोकप्रतिनिधी व अधिकार्याना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होता पैकी २८ लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांनी आपल्यावर ठेवलेल्या थपक्या प्रकरणी बाजू मांडीत आपले म्हणणे सादर केले होते मात्र या पैकी उर्वरित १३ जणां पैकी दोघे अधिकारी पोपट साबळे ,चाटे भास्कर मयत झाले असल्याने त्याचे नोटीसीला उत्तर आले नाही तर पालिकेतील अधिकारी वर्गातील कनिष्ठ अभियंता सुभाष पाटील,उपअभियंता राजेश मोरे,सक्तीची सेवानिवृत्ती घेतलेले माजी सहा.आयुक्त अनिल लाड, माजी सहा.आयुक्त श्रीधर थल्ला ,माजी प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रभाकर जगदाळे,एन.एम.वाळंज,लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत आदी सात आजी माजी पालिका अधिकारयासह, माजी नगरसेविका दुर्गा राजभर,रेवती गायकवाड माजी नगरसेवक शरद गंभीरराव,रामदास पाटील आदी चार माजी नगरसेवक नगरसेविका वर अग्यार समितीने ठपका ठेवल्याने त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटिसा पालिका आयुक्तांनी या पूर्वी बाजावूनही या अकरा जणांनी कारणे दाखवा नोटीसीला कोणतेच उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नसल्याने अखेरीस पालिका आयुक्त गोविंद बोडके यांंनी या अकरा अधिकाऱयांना वृत्तपत्रा द्वारे जाहीर नोटीसी पाठवून द्वारे आपला तत्काळ खुलासा सादर करावा असे आदेशीत करून आठवडाभरात खुलासा सादर न केल्यास आपले काहीही म्हणणे नसल्याचे समजून कारवाई केली जाईल असे नोटीशी द्वारे कळविण्यात आले आहे.
x
Post a Comment