डोंबिवली - ( शंकर जाधव )
अतिवृष्टीने कोल्हापूर , सांगली आणि कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली.अनेकांनी पैनीपै जमा करून उभा केलेला संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला.अश्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या पूरग्रस्तांना शिवसेना सावरण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहेत.कोकणात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता तर अनेक गावे अक्षरशः पाण्यात बुडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.डोंबिवलीतील शिवसैनिकांनी आणि महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी कोकणातील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, वस्तू आणि नवीन साड्या जमा केली आहेत.येथील आमदात वैभव नाईक आणि शिवसेना महिला जिल्हासंघटक जानव्ही सावंत यांना संपर्क करून येथील परिस्थितीविषयी डोंबिवलीतील शिवसैनिकांनी माहिती घेतली.त्यानंतर त्यांना लागणारे समान जमा करण्यात आले.
यावेळी उपशहरप्रमुख किशोर मानकामे, उपशहर संघटक अस्मिता खानविलकर, सीमा अय्यर,शाखा संघटक प्रतिभा नारखेडे, उपशहर संघटक सुनीता जावकर, शाखा प्रमुख संध्या शिर्के, उपशहर सहसंघटक गुलाब म्हात्रे, उपविभाग संघटक कीर्ती महिंडा, महिला शाखा प्रमुख सानिका खाडे,शाखा प्रमुख अजय पांचाळ ,विभाग प्रमुख श्याम चौगुले,उपविभाग प्रमुख प्रकाश खोड, शाखा संघटक गोट्या सावंत,संजय मांजरेकर, ममता घाडीगांवकर आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तांदूळ, गहू, साखर, पोहे, गूळ, डाळ, मीठ ,साबण, बिस्कीट, तेल, बेसन,रवा, कोलगेट, अगरबत्ती, चहापावडर, हळद, जिरे, मौरी,मसाला, तांदळाचे पीठ, नवीन साड्या आदी समान घेऊन सिंधुदुर्ग जिल्यातील मालवण येथील खोतजूवा, देवबाग, कातरली, मसुरडा, कालशे, तोंडवडे अश्या अनेक गावांत पूरग्रस्तांना दिले जाणार असल्याची माहिती डोंबिवली महिला शहर प्रमुख किरण मोंडकर यांनी संगितले.
Post a Comment