खात्यात १५ हजार रुपये जमा
पूरग्रस्तांनी सरकारचे मानले आभार
डोंबिवली :- दि. २३ ( शंकर जाधव ) अतिवृष्टीने डोंबिवलीतील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरून त्यांचे अतोनात नुकसान झाले.भाजप सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करताना त्याच्या बँक खात्यात १५ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते.या आश्वासनाची पूर्तता करत डोंबिवलीतील आयरेगावातील पूरग्रस्तांना बँक खात्यात १५ हजार रुपये जमा झाले आहेत.आय्रेगावातील १५०० पूरग्रस्त असून यातील आतापर्यत ५०० पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली आहे. येथील पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांचे आभार मानताना सरकारची पारदर्शकता दिसून आल्याचे सांगितले.
डोंबिवलीत पूरपरिस्थितीत निर्माण झाल्यानंतर सर्वानीच त्यांना मदत केली. अश्यावेळी सरकारने त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.पुराचे पाणी ओसरल्यानंतर स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी कार्यकर्त्यासह त्यांना तात्पुरते राहण्याची आणि जेवणाची सोय केली होती. यानंतर सरकारी यंत्रणाने सोबत आयरेगावातील पूरग्रस्तांचे अर्ज भरले.यामुळे त्याची माहिती शासनापर्यत व्यवस्थित पोहचली.सरकारने या माहितीच्या आधारे पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या बँक खात्यात १५ हजार रुपये भरण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पूरग्रस्तांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली.याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक नगरसेवक मंदार टावरे म्हणाले. २००५ साली महापुरात तत्कालीन सरकारने पूरग्रस्तांना प्रत्येकी ५ ह्जार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावेळी कोणताही सर्वे न करता खऱ्या पूरग्रस्तांची माहिती न काढता रक्कम त्यांना मिळाली कि नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यावेळी भाजप सरकारने पूरग्रस्तांची माहिती घेऊन त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. आयरेगावातील पूरग्रस्तांना सरकारची आर्थिक रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पूरग्रस्त असलेले गणेश कदम, उषा बेल्लेकर, विलास नागरे, जुबेदा खान यांनी आपल्या खात्यात १५ हजार रुपये जमा झाले असून तसा एसएसएम येत आहे. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस, राज्यमंत्री चव्हाण आणि स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांचे आभार मानत असल्याची भावना व्यक्त केली आहे.
आघाडी सरकार आणि भाजप सरकारमधील फरक...
२००५ साली आघाडी सरकारने पूरग्रस्तांना मदत करताना प्रत्यक्षात त्याच्या हाती ५ हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. मात्र यात काही पूरग्रस्तांच्या हाती प्रत्यक्षात कमी रक्कम मिळाल्याची ओरड सुरु होती. मात्र २०१९ साली भाजप सरकारने पूरग्रस्तांची माहिती घेऊन त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा केली. त्यामुळे कोणत्याही दलालांना यात भष्ट्राचार करता आला नाही. भाजप सरकारने सर्व नागरिकांना बँकेत खाते काढण्यास आणि आधारकार्ड लिंक करण्याचे आवाहन केले होते. त्याचा नागरिकांना फायदाच झाला आहे.
Post a Comment