*डोंबिवलीतील सर्व शाळांमधील शालान्त परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न*
*डोंबिवली :- ( शंकर जाधव )*
शहरातील चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व शाळांमधील शालान्त परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आय लीड ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीचे संस्थापक अतिश कुलकर्णी, मुलाखतकार मीना गोडखिं डी आणि ट्रस्टचे विश्वस्त जयंती पाटकर, विनयकुमा र पाटकर, महाराष्ट्र टेलरिंग इन्स्टिट्यूटचे संचालक गिरीश सराफ आदी मान्यवर उपथित होते.
यावेळी अतिश कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या यशावर हुरळून न जाता नेहमी आव्हानांसाठी सज्ज व्हा असा अमूल्य सल्ला दिला. यावेळी त्यांनी पालकांनाही बाल शिवबांना छत्रपती बनविणाऱ्या जिजाऊंचे उदाहरण देऊन पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी आधी पालकांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे असे सांगून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देऊन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर मीना गोडखिंडी यांनी अष्टावक्र ऋषींची कथा सांगून विद्यार्थ्यांनी बाह्य गुणांवर भर न देता अंतर्गुण जोपासावे आणि विद्येला सर्वस्व भूषण समजावे असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. आपल्या यशस्वी वाटचालीसाठी जिद्द, चिकाटी आणि महत्वाकांक्षा यांची नितांत आवश्यकता आहे तेव्हा आपल्या आवडीनुसार आपलं क्षेत्र निवडा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी सज्ज व्हा असे सांगितले. यावेळी ९१ टक्के व अधिक गुण मिळविणाऱ्या एकूण १०० विदार्थ्यांचा सत्का र करूनप्रमाणपत्र आणि ५०० पये रोख रकमेचे शालोपयोगी पुस्तकांचे कुपन देऊन प्रत्येक विद्यार्थ्यास गौरविण्यात आले. ट्रस्ट संचालित शिवण वर्ग प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ट्रस्टतर्फे दरवर्षी शहरातील दहावीतील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते यावर्षी अथर्व शिवदत्त आजगावकर, मानसी महेश चव्हाण, तन्वी संतोष मेस्त्री, अमेय बागकर या लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील प्रधान यांनी केले.
Post a Comment