डोंबिवलीत मनसेची प्रतीकात्मक इव्हिएम मशीन दहीहंडी..



 डोंबिवली : ( शंकर जाधव ) देशभरात इव्हिएम मशिन वापरावर प्रचंड नाराजी पसरली आहे.आगामी विधानसभा निवडणुकित मतदानासाठी  इव्हिएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी अनेक राजकीय पक्षांकडून होत आहे. यंदा अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगली आणि कोकणात नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा नवनिर्माण दहीहंडी करणार नाही असा निर्णय घेतला आहे. मात्र प्रतीकात्मक इव्हिएम मशीन दहीहंडी फोडू असे मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले. मानपाडा रोडवरील दरवर्षी ज्या ठिकाणी नवनिर्माण दहिहंडी गोविंदा पथक फोडत होते त्या ठिकाणी प्रतीकात्मक इव्हिएम मशीन दहीहंडी लावण्यात येणार आहे.


     ही दहीहंडी गोविंदा पथक फोडणार नसून मनसैनिकच फोडतील.फार उंचीवर न बांधता एक ते दोन थरांची हि दहीहंडी असणार आहे.यावेळी मनसेचे नेते राजू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही दहीहंडी फोडण्यामागे एकच उद्देश आहे कि, आगामी विधानसभा निवडणुकित बॅलेट पेपरवर मतदान व्हावे अशी मनसेची मागणी आहे.जनतेलाही मनसेची मागणी समजावी.ही दहीहंडी फोडताना डोंबिवलीकर नक्कीच गर्दी करतील असे मनसैनिक सांगत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post