शिवसेना नगरसेवक राजेश मोरे  यांचा महासभेत  नगरसेवक पदाचा राजीनामा  देण्याचा इशारा...  



डोंबिवली  :-  ( शंकर जाधव  )   शिवसेनेचे नगरसेवक  राजेश मोरे यांनी दत्तनगर बीएसयुपी प्रकल्पातील झोपडपट्टी मधील ४३०  लाभार्थ्यांना प्रथम घरे द्या अन्यथा आपला नगरसेवक पदाचा राजीनामा घ्या असा इशारा  सभागृहात दिला .त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत लाभार्थ्याची यादी निश्चित करून ती  पुढील महासभेत मंजुरीसाठी आणावी तद्नंतरच पंतप्रधान आवास योजनेतून रेल्वे बाधितांना देण्यासाठी रेल्वेला घरे विकण्याच्या प्रस्तावास मान्यता देणार असल्याची भूमिका महासभेने घेतली.
            केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून २००७   साली पालिका क्षेत्रात बीएसयूपी  योजनेतून उभारण्यात आलेल्या घरा पैकी ३०००  घरे रेल्वेच्या डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधितांना देण्यासाठी रेल्वेला देण्याचे प्रयोजन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले असून यातून सुमारे ४००  कोटी रुपयाचे उत्पन्न पालिकेला मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. रेल्वेला हि घरे देण्यासाठी मान्यता देण्याचा प्रस्ताव आज प्रशासनाच्या वतीने महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. मात्र बीएसयूपीचे खरे लाभार्थी आजही वंचित असताना हि घरे विकण्याच्या प्रस्तावावर नगरसेवकांनी हरकत घेतली. बीएसयूपी च्या लाभार्थीची यादी महासभे समोर आणत लाभार्थ्यांना घरे द्या त्यानंतरच विक्री करा असे प्रशासणाला खडसावले  . यायोज्नेतून उभारण्यात आलेली घरे बंद असून त्याच्या दारे खिडक्या तुटल्या आहेत. यामुळे आणखी काही दिवस हि घरे बंद राहिली तर त्याचे भूतबंगले होतील तत्पूर्वीच लाभार्थ्यांना त्याचा ताबा द्या अशी मागणी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी केली. तर बीएसयुपी योजनेसाठी सर्वात प्रथम डोंबिवलीतील दत्तनगर झोपड पट्टीवर हातोडा मारण्यात आला होता मात्र आजही  हे ४३० लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी वारंवार पालिकेकडे चकरा मारून देखील पालिका प्रशासनाकडून या लाभार्थीची यादी तयार केली जात नसल्यामुळे पालिकेच्या भुमिकेविरोधात नगरसेवक राजेश मोरे यांनी आपला तसेच पत्नी भारती मोरे या दोघांचाही नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तर विश्वनाथ राणे यांनी गरिबांना रस्त्यावर आणत या योजनेतील घराची विक्री करण्याच्या प्रशासनाच्या निर्णया विरोधात सभागृहातील १२७ नगरसेवक राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले .त्यानंतर महापौर विनिता राणे यांनी  प्रशासनाला पुढील महासभेत या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्याची यादी सादर करण्याचे आदेश   दिले.

Post a Comment

Previous Post Next Post