पावसामुळे
कल्याणात घर आणि इमारतीच्या भिंती कोसळण्याच्या घटना
कल्याण (०३) - कल्याण डोंबिवली परिसरात काल रात्रीपासून मुसळधार
पाऊस पडत आहे. महापालिका क्षेत्रात सकाळपर्यंत १५८ मिमी
पाऊस पडला असून आजपर्यंत २४५४ मिमी इतका पाऊस पडला आहे. महापालिकेच्या अ प्रभागातील सखल भागात तसेच ब प्रभागातील अनुपमनगर, घोलप नगर इत्यादी सखल भागात पाणी साचले असून अद्याप परिस्थिती नियंत्रणात
आहे. क प्रभागातील चौधरी मोहल्ला येथे धोकादायक असलेले
एक घर पडले असून त्यात कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी झाली नाही. ड प्रभागातील प्रभाग क्र. १०० मध्ये जीवनछाया
व शामा या चाळींच्या सखल भागात पाणी शिरले असून तेथील नागरिकांसाठी
महपालिकेमार्फत अन्न पाकिटांची व्यवस्था करण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे
डोंबिवली स्थानक परिसरात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून सदर पाणी उपसण्याचे
काम महापालिकेतर्फे सुरु आहे. जे प्रभागातील अतिधोकादायक असणा-या समाधान इमारतीचा काही भाग काल कोसळला असून त्यातील ५ कुटूंबाना
सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे
वालधुनी, शिवाजी नगर, अशोक
नगर येथील सखल भागात पावसामुळे पाणी शिरले असून तेथील बाधित नागरिकांसाठी अन्न
पाकिटांची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. कचोरे येथील काही घरांवर काल रात्री दरड कोसळली असून तेथील लोकांना
सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. आय
प्रभागातील पिसवली-दावडी येथील चाळींमध्ये पाणी शिरले असून
तेथील बाधित नागरिकांसाठी अन्न पाकिटांची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात
येत आहे. महापालिका आयुक्त
गोविंद बोडके, उप आयुक्त, विजय
पगार, मारुती खोडके यांनी प्रभाग अधिका-यांसमवेत समक्ष पाहणी करुन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना
प्रभागक्षेत्र अधिका-यांना दिल्या.
Post a Comment