पावसाच्या आपत्तीजन्य परिस्थितीत सामान्य माणसाचे मोडले कंबरडे
ठाण्यासह कल्याण ग्रामीण भागांत पावसाचे धुमशान
काळू
नदीवरील पूल गेला पाण्याखाली : १०
ते १२ गावांचा शह्राशी संपर्क तुटला..
ठाणे - कल्याण - टिटवाळा :
सकाळपासून ठाण्यासह कल्याण डोंबिवली परिसरात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे सर्वत्र
पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. टिटवाळा
नजीकच्या रूंदे गावाजवळील काळू नदीवरील पुल हा पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर वासुन्द्री गावा जवळील पूलाला देखील पाणी लागत
आले असून तोही पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मागील ६ दिवसांपूर्वी पावसाने
सर्वत्र झोडपुन काढल्यानंतर उसंत मिळते न मिळते तोच शुक्रवारी
मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा मुसळधार सुरुवात केल्याने हळू हळू पूर्वपदावर
येत असलेले जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे.
शुक्रवारी
रात्रीपासून पावसाने पुन्हा कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात जोर कोसळण्यास
सुरुवात केली. यामुळे रुंदी गावाजवळील कळू नदीवरील पूल शनिवारी सकाळी पाण्याखाली
गेल्याने येथील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला आहे. हा पूल यंदाच्या पावसाळ्यात
आतापर्यंत सहा वेळा पाण्याखाली गेल्याने या परिसरातील गावांतील नागरिकांची मोठ्या
प्रमाणात त्रेधा उडाली आहे. येथील नोकरदार
वर्ग शालेय विद्यार्थी,
भाजीपाला व दुध विक्रेते यांना मोठ्या प्रमाणात या पुराचा बसून त्यांची वाताहत झाली आहे. नदीच्या
दोन्ही तीरावर अडकून पडलेले आणि घरी जाण्यासाठी जमलेले ग्रामस्थ पुलावरील पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत.
तसेच याच काळू
नदीवर वासुंद्री गावा लगत असणाऱ्या पुलाला देखील पाणी लागले असून तोही पाण्याखाली
जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर हा पुल लवकर
खाली होणार नाही अशा प्रकारची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या टिटवाळा शहरासह
कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे. नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत
असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यात
सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे !
वेधशाळेचा अंदाज आणि भरतीची तीव्रता यामुळे यात भर पडली आहे ! नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विशेषतः
घराघरात शिरलेल्या पाण्याच्या क्षेत्रातील जनजीवन थोडेफार पूर्वपदावर येत असताना
परत हीच वेळ आली आहे ! तळमजल्यावरील फ्लॅटचे तसेच बैठ्या घरांतील चिजवस्तूंचे
मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे !
या आपत्तीत
समान्य माणसाचे कंबरडे मोडले असून मागच्या
पावसात म्हणजे पाच सहा दिवसांपूर्वीच्या आपत्तीत
खाण्यापिण्याच्या वस्तूंसह घरातील सर्वच वस्तूंचे नुकसान होऊनही याबाबतीत
काहीही निश्चित घोषणा झालेली नाही ! त्यात परत हीच वेळ आली आहे !
या पुरक्षेत्रात
वाटली पाहिजे किंवा किमान काहीतरी ठोस घोषणा करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी
आहे. तसेच लगतच्या
सर्व धरणांची माहिती येत आहे ! KDMC क्षेत्र व
लगतच्या दोन्ही तिन्ही तालुक्यांवर परिणाम होणाऱ्या "बारवी धरण" बाबत
उलटसुलट अफवा पसरवल्या जात असून आताच्या पावसाच्या प्रमाण बघता दर तासाने याबाबतीत
अधिकृतपणे जाहीर सूचना प्रसारीत होत होणं
आवश्यक असल्याचे देखील जाणकारांचे म्हणणे आहे.
Post a Comment