जीवनावश्यक वस्तूंसाठी एक विशिष्ट पद्धतीने मार्किंग करत भाजपाचे कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी लावली लोकांना शिस्त

टिटवाळा: ( अजय शेलार )  कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉक डाऊन घोषित केल्यानंतर जीवनावाश्यक  वस्तूंसाठी लोकांची किराणामालाच्या दुकानात अनेक ठिकाणी एकच गर्दी झालेली लक्षात आल्यानंतर येथील भाजपाचे कल्याण जिल्हा सचिव  प्रदीप भोईर यांनी आपल्या निवडक लोकांच्या मदतीने स्वत:ची आणि इतरांची सुरक्षा राखत या लोकांमध्ये जनजागृती करत साध्या आणि सोप्या मात्र प्रभावी पद्धतीने जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांना एक विशिष्ट पद्धतीने  स्वतः दुकानदारांना मार्किंग करून दिली आहे.
संचारबंदीमुळे काहिश्या भयभीत झालेल्या लोकांनी किराणा घेण्यासाठी दुकानांवर एकाच गर्दी केली होती. हे मांडा टिटवाळा कोळीवाडा गावात राहणारे  भाजपाचे कल्याण जिल्हा सचिव  प्रदीप भोईर यांना समजल्यानंतर  अश्या प्रकारे गर्दी लोकांकडून झाली तर आपला शासनाकडून सांगण्यात येणारा  गर्दी टाळण्याचा उद्देश सफल होणार नाही आणि आपल्या अडचणीत अधिकच भर पडेल हे लक्षत आल्यानंतर त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेत आपल्या निवडक लोकांच्या मदतीने लोकांमध्ये जनजागृती करत साध्या आणि सोप्या मात्र प्रभावी पद्धतीने जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी एक ठराविक आणि सुरक्षित अंतर परस्परांत राखले जाईल अशी प्रत्येक दुकानांच्या समोर लोकांना एक विशिष्ट पद्धतीने  स्वतः दुकानदारांना मार्किंग करून दिली आहे. त्यामुळे ही पद्धत सर्वांनी आमलात आणल्यास आपल्या सर्वांचा कोरोनो विरुद्ध असलेला लढा हा सफल होईल ही जबाबदारी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे असे मत यावेळी  त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post