टिटवाळा : (अजय शेलार ) कोरोनोच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झालेली आहे. मात्र तरीही अनेकजण विनाकामाचे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यांना पांगवण्यासाठी आणि गर्दी , जमाव टाळता यावा यासाठी चौका चौकात , रस्त्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र हे करत असताना लॉक डाऊनमुळेकाही ठिकाणी पोलीसांनाही साधा चहा मिळणेही दुरापास्त झाले आहे. सर्वत्रच बंद असल्याने त्यांच्या खाण्या –पिण्याची गैरसोय होत आहे. ही अडचण लक्षत घेऊन येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे महेश एगडे यांनी आपल्या राजे ग्रुपच्या माध्यमातून सुरक्षितता बाळगत पोलिसांसाठी चहा अल्पोपहार त्याचबरोबर जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
पोलीस स्टेशनला नाईट ड्युटी ला जे अधिकारी ,कर्मचारी आहेत . आपल्या साठी जिवाची पर्वा न करता आपल्यासाठी रस्त्यांवर उभे राहत आपले कर्तव्य निभावणाऱ्या अधिकारी व कर्मचार्या साठी राजे ग्रुपचे महेश एगडे यांनी पुढाकार घेत त्यांच्या चहा नाश्ता आणि जेवणाचीही सोय केली आहे. पोलीसांनी त्यांच्या या कार्याचे कातुक करत समाधान व्यक्त केले आहे. तर आपण आम्हाला कुठलही सुविधा नाही दिली तरी चालेल पण गरज नसताना कृपया घराबाहेर पडू नका . एवढे जरी केलेत तरी आम्हाला खूप काही मिळाल्यासारखे आहे अश्या भावना यावेळी पोलीस कर्मचाऱ्यानी व्यक्त केल्या.
Post a Comment