कल्याणमध्ये नगरसेवकाच्या अटकेचा जाब विचारल्याने भाजप आमदारावरही गुन्हा, कोळसेवाडी पोलिसांची बदनामी कारक विडिओ व्हायरल

 


कल्याण प्रतिनिधी (रोशन उबाळे ) -  केडीएमसीच्या भाजप नगरसेवकावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी नगरसेवकासह त्याच्या दोन मुलांना दोन तास लॉकअपमध्ये बंद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे . सत्तेची झिंक न उतरलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी  पोलिसांना अरेरावी  करत बदनामीकारक शब्दांचा लाखोल्या वाहिल्या तसेच जमाव  जमवून कोरोना महामारीचें नियमांचे  उल्लंघन केल्या प्रकरणी विविध कलमा अन्वेय कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 कल्याण डोंबिवली महापालिकेचे  भाजप नगरसेवकावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी नगरसेवकासह त्याच्या दोन मुलांना दोन तास लॉकअपमध्ये बंद करुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांना माहिती मिळताच ते तातडीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक  शाहूराव  साळवे याांना

फैला घेतले . तब्बल एक तास पोलीस ठाण्यात या प्रकरणावरुन गोंधळ सुरु होता. कोरोना चे भान विसरलेल्या आणि प्रसिद्धी साठी हापपलेलेल्या आणि विरोधकाना शह देण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात आमदार गणपत गायकवाड पोलिसांना धारेवर धरत लाखोल्या वाहिल्या त्याच बरोबर भाजप पदाधिकारी कार्यकत्यांचा जमाव जमा केला. कोरोना  महामारी चा जणू विसरच पडला होता त्याच प्रमाणे घडलेल्या घटनेचा विडिओ लाईव्ह सोशल मीडियावर करण्यात आला.  त्यामुळे कोळसेवाडी पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला .

 दरम्यान अखेर पोलिसांनी भाजप आमदाराविरोधातही गुन्हा दाखल केला आहे . केडीएमसीतील भाजप नगरसेवक मनोज राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्यांचा काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल (१४ ऑगस्ट) दुपारी हाणामारीत झाले. त्यानंतर राय हे आपल्या दोन मुलं आणि काही कार्यकर्त्यांसोबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते आणि या नाट्यमय घटना घडल्या 

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वी.कलम १८६ , १८१ आणि  साथी रोग प्रतिबंध कायदा ,१८८ अन्वेय आमदार गायकवाड आणि भाजपा नगरसेवक मनोज राय यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे .

1 Comments

  1. Kaydyache ullanghan karnaryanvar niyamanusaar karwai karnyat yavi

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post