रोशन उबाळे कल्याण प्रतिनिधी :( ३१ -०८ २०२० ) - कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शाहूराजे साळवे यांना उपमर्द व मानभंग करून अपमानित करणाऱ्या आमदार गणपत गायकवाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि अट्रोसिटी दाखल करण्यासाठी मागासवर्गीय संघटनांनी थोपटले दंड आहे या प्रकरणी अनुसुचित जाति/ जनजाती संघटनाां अखिल भारतीय परिसंघचे महासचिव रमेश पौळकर यांनी राज्याचे गृहमंत्री आणि अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती आयोगाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे .
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जमिनीच्या वादाचे प्रकरण आले होते त्यावेळी तक्रार घेतली नाही म्हणून वाद झाला होता हे प्रकरण बिल्डर आणि भाजप नगरसेवक मनोज राय आणि गजानन म्हात्रे यांच्या वाद झाला होता त्या संदर्भात कारवाई सुरू असताना नगर सेवक आणि त्याच्या मुलांना कोठडीत का डांबले यावरून वाद सुरू झाला त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड आणि ३० च्या वर कार्यकत्ये सामावून पोलीस ठाण्यात अरेरावी करीत जाणीवपूर्वक उपमर्द व मानभंग करून सार्वजनिक ठिकाणी धमकावून अपमान पानउतारा करन सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आपराधां विरोधात ३५३ आणि अट्रो सिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार रमेश पौळकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य एससी-एसटी आयोग , अतिरिक्त पोलीस आयुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त आणि तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे .तहसीलदार आडके यांनी जिल्ह्यधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या कारवाई साठी पाठविले आहे त्याचे पत्र पौळकर याना दिले आहे .
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार कराळे यांनी दबावतंत्रामुळे अत्यंत सौम्य दर्जाचे कलमे लावून गुन्ह्यातील गांभीर्य कमी केले आहे त्यात त्यांनी सरकारी कामात अडथळा म्हणजे ३५२ कलम समाविष्ट केले नाही त्यामुळे आरोपी यांना तात्काळ अटक करावी लागली असती असा आरोप संघटनेचे महासचिव रमेश पौळकर यांनी केला आहे हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले त्याचे कलम ही गुन्ह्यात नाहीत त्यामुळे फिर्यादीतील तसेच कर्तव्ये तील अक्षम्य त्रुटी व कसुरी दूर करून आमदारांसह घटनास्थळी हजर असलेल्या ३० च्या वर समर्थकांवर तात्काळ ३५३ कलम आणि अट्रोसिटी अन्वेय गुन्हे दाखल करण्याची मागणी पौळकर यांनी केली आहे .
Post a Comment