भरत नाट्यम् , कथ्थक, श्लोकपठण , स्वरचित काव्यवाचन आणि कँरम या आँनलाईन स्पर्धांचा अंतर्भाव
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीतील प्रसिद्ध टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा ७१ वा गणेशोत्सव कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने आणि घरगुती स्वरूपात करण्यात आला. मंडळ दरवर्षी उत्सवसत्रात टिळकनगर वासियांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करते. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मंडळातर्फे यावर्षी प्रथमच संपूर्ण डोंबिवलीकरांसाठी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध वयोगटांसाठी टिडीसीए मान्यताप्राप्त कॅरम स्पर्धा, श्लोकपठण स्पर्धा, स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आणि शास्त्रीय नृत्य स्पर्धा या स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. सर्व स्पर्धांमध्ये एकूण १५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन मंडळाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धांपैकी कॅरम स्पर्धेच्या आयोजन आणि परिक्षणासाठी टीडीसीए चे श्री.मुकेश देय, श्री.दयानंद चोथळ व श्री. दत्तप्रसाद शेंबेकर यांचे मार्गदर्शन मंडळाला लाभले. श्लोकपठण स्पर्धेच्या परिक्षणासाठी श्री. आमोद दातार (एम.ए. संस्कृत) यांचे सहकार्य मिळाले. स्वरचित काव्यवाचन स्पर्धेच्या परिक्षणाचे काम डोंबिवलीतील रहिवासी सौ. श्वेता रानडे आणि सौ. अपर्णा मोडक यांनी पाहिले. तर शास्त्रीय नृत्य स्पर्धेसाठी एकलव्य आर्ट फाऊंडेशनच्या संचालिका नृत्यविशारद ऍड. सौ. सुनिला पोतदार, सिद्धी नृत्यकला मंदिरच्या संचालिका नृत्यालंकार सौ. श्रद्धा भिडे आणि पवित्र आर्ट व्हिज्युअल इन्स्टिट्यूटचे संचालक भरतनाट्यम् नर्तक श्री. पवित्र भट या तज्ञांचे मार्गदर्शन मंडळाला लाभले.
सर्व स्पर्धांचा निकाल ३१ ऑगस्ट रोजी मंडळाच्या फेसबुक पेज वर जाहीर करण्यात आला. सर्व स्पर्धकांना मंडळातर्फे सहभागाबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तसेच विजेत्या स्पर्धकांच्या सादरीकरणाचे व्हिडिओ मंडळाच्या पेज वर प्रसिद्ध करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे -
*कॅरम स्पर्धा -*
*१८ वर्षाखालील -*
१) समृद्धी घाडीगावकर
२) नेहा तेवर
३) मधुरा देवळे
४) वेदांत साळवे
५) चैताली सुवारे
६) आयुष कातळकर
७) अथर्व म्हात्रे
८) लक्ष्य परब
*खुला गट -*
१) अस्लम चिकटे
२) जगदीश शिरसाट
३) काशिफ शेख
४) दीपक गनिका
५) प्रदीप साटम
६) श्रीकांत कोळी
७) संदीप चौधरी
८) विलास आंबवलेे
*श्लोकपठण स्पर्धा -*
*गट - १ (इयत्ता १ ली ते ४ थी)*
प्रथम क्रमांक - कु. अनन्या बोगा
द्वितीय क्रमांक - कु. अवधूत साने
तृतीय क्रमांक - कु. सुमेध कुलकर्णी
*गट - २ (इयत्ता ५वी ते ८वी)*
प्रथम क्रमांक - कु. शाल्मली दुर्वे
*स्वरचित काव्यवाचन स्पर्धा -*
*गट १ (इयत्ता ८वी ते १०वी)*
प्रथम क्रमांक - कु. सृष्टी दांडेकर
द्वितीय क्रमांक - कु. नंदन कार्ले
*गट २ (खुला गट) -*
प्रथम क्रमांक - स्वाती भाट्ये
द्वितीय क्रमांक - ओंकार करंदीकर
*शास्त्रीय नृत्य - भरतनाट्यम्*
*गट १ - (वय वर्ष ५ ते १०)*
प्रथम क्रमांक - कु. प्रकृती जोशी
द्वितीय क्रमांक - कु. आथमी पूंजा
तृतीय क्रमांक - कु. हर्षदा शेलार
*गट २ - (वय वर्ष ११ ते १५)*
प्रथम क्रमांक - कु. मालविका नायर
द्वितीय क्रमांक - कु. गिरिजा जैतपाल
तृतीय क्रमांक (विभागून) - कु. साक्षी पै आणि कु. स्वरा राऊत
उत्तेजनार्थ (विभागून) - कु. अदित्री अरमुगम आणि कु. मोनिशा महेश्वरी
*गट ३ ( वय वर्ष १६ ते २२)*
प्रथम क्रमांक - कु. एकता पाटील
द्वितीय क्रमांक - कु. सृष्टी लोकापुर
*शास्त्रीय नृत्य - कथक*
*गट १ (वय वर्ष ५ ते १०)*
प्रथम क्रमांक - कु. सारा मोरे
द्वितीय क्रमांक - कु. पर्णवी पटवर्धन
तृतीय क्रमांक - कु. मैत्री थत्ते
*गट २ (वय वर्ष ११ ते १५)*
प्रथम क्रमांक (विभागून)- कु. श्रेणी सुवारे आणि कु. काव्या वेंकटचलम
द्वितीय क्रमांक (विभागून)- कु. आर्या दास आणि कु. प्रिशा हर्डीकर
तृतीय क्रमांक (विभागून) - कु. श्रुती चाळके आणि कु. निशा पवार
उत्तेजनार्थ १ - कु. अर्चिता छेडा
उत्तेजनार्थ २ - कु. तनिष्का देशपांडे
*गट ३ (वय वर्ष १६ ते २२)*
प्रथम क्रमांक (विभागून) - कु. अवनी पटवर्धन आणि कु. अनमोल पोतनीस
द्वितीय क्रमांक (विभागून) - कु. समृद्धी चव्हाण आणि कु. निशिगंधा केतकर
तृतीय क्रमांक - कु. सई बिवलकर
उत्तेजनार्थ १ - कु. रिया मोरे
Post a Comment