कल्याण डोंबिवलीत ४२९ नवे रुग्ण तर १० जणांचा मृत्यू...२९,६४९ एकूण रुग्ण तर ६४८ जणांचा आतापर्यंत मृत्यू... तर २४ तासांत २२३ रुग्णांना डिस्चार्ज




कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४२९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ४२९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २९,६४९ झाली आहे. यामध्ये ३११४ रुग्ण उपचार घेत असून २५,८८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


आजच्या ४२९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ५९,  कल्याण प.- १५७, डोंबिवली पूर्व १०३, डोंबिवली प- ५०, मांडा टिटवाळा – ४३, मोहना येथील १७  रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून तर १३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post