कल्याण
: कोरोना महामारानीने संपूर्ण जगाला विळखा घातला आणि
सर्वत्र हाहाकार माजला अनेकांचे रोजगार , बहुतांशी व्यवहार ठप्प झाले. अनेकांवर घरी बसण्याची
वेळ आली मात्र अश्याही परिस्थितीत आपले कर्तव्य चोखपणे बजावणारे डॉक्टर, पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि या सगळ्याइतकाच महत्वाचा असलेला घटक
म्हणजे सफाई कर्मचारी याने देखील जीवाची बाजी लावीन आपले कर्तव्य निभावले आणि आजही
ते पार पाडत आहेत. मात्र याच सफाई कामगारांचे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासूनचे
वेतन महापालिकेकडून थकीत थावण्यात आल्याने हीच का कोरोना योद्ध्यांची किंमत
...असा आर्त सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे . तर मेलेल्याच नाही तर
जिवंत माणसांच्याही टाळूवरचे लोणी खाणारे महापालिकेचे अधिकारी आहेत अश्या संतप्त
प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आणि महानगर सफाई कर्मचारी संघ( नियोजित )चे
महासचिव मनोज वाघमारे यांनी व्यक्त केल्या आहेत.
कोविडचा प्रादुर्भाव झापाट्याने वाढण्यास सुरुवात
झाल्यानंतर आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने लॉकडाऊनच्या खाजगी
तत्वावर मोठ्या प्रमाणांत कामगारांची भरती करण्यात आली . हाताला काम नसलेले अनेक
गरजू युवक विविध धोके पत्करून या कामासाठी खाजगी तत्वावर रुजू झाले.
कोरोनासारख्या महामारीच्या काळातही महापालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टीने अपुऱ्या
सेवा कामगारांना देण्यात आल्यानंतरही हे कामगार जीवाची बाजी लावून रात्रंदिवस
घाणीत हात घालून काम करत होते. याची तरी अधिकारी वर्गाने लाज बाळगावी असे सांगत या
काळात महापालिका क्षेत्रातील परिसरात असलेला ओला सुका कचरा अशा अत्यावश्यक या
सेवेत कार्यरत असलेले एकूण २३७ कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती यावेळी महानगर
सफाई कर्मचारी संघ( नियोजित ) यांनी दिली आहे. मात्र दोन ते तीन महिने
उलटूनही या कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिका प्रशासन आणि मेलेल्याच नाही तर जिवंत
माणसांच्याही टाळूवरचे लोणी खाणारे महापालिकेचे अधिकारी जाणूनबुजून देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप महानगर
सफाई कर्मचारी संघ यांनी प्रशासनावर करत हीच का कोरोना योद्ध्यांची किंमत असा आर्त
सवालही केला आहे. यामुळे सदर कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून
महापालिका प्रशासनाने तत्काळ या प्रकरणी लक्ष घालून आम्हा कामगारांचे थकीत
वेतन अदा करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अश्या आशयाचे निवदेनही त्यांनी
महापलिका उपायुक्त ( घनकचरा विभाग ) यांना दिले आहे.
तर
ज्यांच्या देखरेखीखाली हे
काम चालू होते ते उपायुक्त ( घनकचरा विभाग ) कोकरे यांना विचारले असताना त्यांनी
सोयीस्करपणे नेमके उत्तर देण्याचे टाळले .
Post a Comment