पालिका आयुक्त डॉ. विजय
सूर्यवंशी गैरहजर
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली महानगर हद्दीत राजरोजपणे अनधिकृत बांधकाम सुरु आहेत. या काही अनधिकृत बांधकामांवर दिखाव्याची कारवाई करून ढोल बडविणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे गेल्या ६० दिवसांपासून आंदोलन करत आहेत.निंबाळकर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामविरोधात तक्रार केली होती. याची दाखल घेत झिरवाळ यांनी पालिका आयुक्तांना झिरवाळ विधानसभेच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास लेखी कळविण्यात आले होते.मात्र गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्या कार्यालयात सदर विषयासंबंधी पालिका आयुक्त हजर राहिले नाहीत. माहिती देण्यासाठी उपायुक्त सुधाकर जगताप यांसह अधिकारी वर्ग उपस्थित होते. पालिका आयुक्त गैरहजर राहिल्याने झिरवाळ यांनी उपायुक्त जगताप यांना चांगलेच झापले.काही दिवसात पुन्हा बैठक होणार असून त्या बैठकीत पालिका आयुक्तांनी हजेरी लावली नाही तर मला निर्णय घ्यावा लागेल असे झिरवाळ यांनी सुनावले.पालिका आयुक्त या बैठकीत का उपस्थित राहिले नाही याचे उत्तर उपायुक्त जगताप यांच्याकडे नव्हते.
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत पालिकेच्या डोळ्यासमोर अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.प्रभाग क्षेत्र अधिकारी काही अनधिकृत बांधकामावर दिखाव्याची कारवाई करत असल्याने `तेरी चूप
मेरी भी चूप` असा प्रकार प्रशासन आणि अनधिकृत बांधकाम करणारे विकासक यांच्यात सुरु आहे.अनधिकृत बांधकाम हा शहराला लागलेला डाग असून तो पुसून टाकण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. अनधिकृत बांधकाम करत असलेले काही विकासक डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या फेऱ्या मारताना दिसतात.ते विकासक कोणाशी गुप्त भेट घेण्यासाठी येतात याची चौकशी होणे आवश्यक आहे.मात्र याच विभागीय कार्यालयाच्या बाहेर समाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत,याची साधी दाखल देखील प्रशासनाने घेतली नाही.अखेर निंबाळकर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांसंदर्भात तक्रार केली. याची दाखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी गुरुवारी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना सदर विषयासंदर्भात माहिती घेण्यासाठी बोलवले होते.मात्र बैठक सुरु असताना पालिका आयुक्त हजर नसून त्याजागी उपायुक्त जगताप यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. पालिका आयुक्त आले नसल्याने पाहून झिरवाळ हे संतापले. आयुक्तांना बोलावले असून तुम्ही का आलात ? पुढील बैठकीत पालिका आयुक्त आले नाही तर कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांबाबत निर्णय घेऊ असे सांगितले.तर समाजिक कार्यकर्ते निंबाळकर यांनी अनधिकृत बांधकामाबाबत पालिका प्रशासना उदासीन असून कडक कारवाई करत नसल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना सांगितले.यासंदर्भात पालिका उपायुक्त सुधाकर जगताप यांना विचारले असता त्यांनी पुढील बैठक होणार असल्याचे सांगत अधिक माहिती दिली नाही.
Post a Comment