मुरुड जंजिरा प्रतिनिधी ( गोविंद हिरवे )
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मुरुड तालुक्यातील वाणदे - जोसरांजन येथील महादेव हशा दिवेकर विद्या मंदिराचे मुख्याध्यापक प्रकाश बाळाराम
खरसंबळे आपली 32 वर्ष 4 महिन्याची सेवा उत्तम प्रकारे करून सेवानिवृत्त झाले त्यांना शालेयसमितीचे चेअरमन तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात निरोप देण्यात आला.
शाळेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन तुकाराम पाटील सदस्य अजित कासार, राजेश दिवेकर, विधमान मुख्याध्यापक गजानन पाटील, माजि केंद्र प्रमुख प्रेमला खरसंबळे , सखाराम गायकर, महादेव गायकर , अशोक नाक्ती, दामोदर पाटील, प्रकाश भायदे किरण पाटील, जठारीसर महेंद्र पाटील, वळवी, योगेश भगत, शिंदे मॅडम , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व खरसंबळे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते
कोकण एज्युकेशन सोसायटी च्या रोहा तालुक्यातील दुर्गम भागातील घोसाळे विद्यालयातील शाळेत दि. 6 सप्टेंबर 1988 पासून शिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांनी पनवेल उरण चिरनेर , अलिबाग- कुर्डुस या शाळेत उत्तम प्रकारे काम केले .
कोरोना रोगाच्या पारशव भुमिवर लाॅकडाउन काळात प्रकाश खरसंबळे जोसरांजन विद्यालयात मुख्याध्यापक पदी विराजमान झाले होते. त्यांना सन 2010 चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कार 2011 पुणे येथील ऑनलाईन स्पर्धेत भाग घेतला होता . त्यांनी अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य पदी पाच
वर्षे चांगले काम केले आहे.
सामाजिक कार्यात यांच भागातील पिटकरी गाव सुद्धारणेचा वसा घेऊन अनेकविध विकक कामे केली आहेत .
जोसरांजन विद्या लयात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ श्रीगणेश प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन प्रकाश खरसंबळे यांना निरोप देण्यात येऊन पुढिल भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Post a Comment