श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ता. आदिवासी सम्राटचे संपादक गणपत वारगडा यांनी कोरोनाच्या काळात विशेष कामगिरी केल्याने “पञकार पुरस्कार” देण्यात आले. यावेळी पनवेल महानगर पालिकेच्या महापौर सौ. कविता चौतमोल, पनवेल महानगरप्रमुख शिवसेना रामदास शेवाळे, नगरसेवक राजू सोनी, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, महाराष्ट्र सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब, महाराष्ट्र राज्य कामगार सहचिटणीस केवळ महाडीक, सचिव मंगेश लाड, सहचिटणीस सचिन लोखंडे, ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश महाजन, नवी मुंबई अध्यक्ष डॅनी डिसोझा, महाराष्ट्र महिला अध्यक्षा अर्चना पार्टे यांच्या हस्ते देण्यात आले.
Post a Comment