जळोद आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनची समस्यांचा "पाढाच" मोजून बिरसा ब्रिगेडने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन

 


अजय भरसट-  शिरपुर 

शिरपुर ता.असलेले आदिवासी आश्रमशाळा जळोद येथील विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा  निघाला असता ही घटना बिरसा ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांना दि.10/02/2021 माहीत पडलीआणि त्याच क्षणी बिरसा ब्रिगेड चे शिलेदार जळोद येथील आश्रम शाळेत धाव घेतली आणि तेथील विद्यार्थ्यांचे समस्या जाणून घेतले आणि संस्थेचे चेअरमन यांना शाळेत बोलवून समस्या ची सखोल चौकशी करण्यात आली आणि सोमवार पर्यंत सर्व समास्याचे निराकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले असता त्यात काहीही फरक जाणवला नसून आज दि17/02/2021बिरसा ब्रिगेड चे सातपुडा विभागाध्यक्ष सुंदरलाल पावरा,जिल्हाध्यक्ष दिनेश पावरा,जिल्हाउपाध्यक्ष जगदिश पावरा,दीपक पावरा,तालुकाध्यक्ष भरत पावरा,तालुकाउपाध्यक्ष सुनील पावरा,तालुका सहसचिव चंदन पावरा,तालुकाकोषाध्यक्ष रमेश पावरा,नांदेर्डे चे युवा पोलिस पाटील पंकज पावरा मेका पावरा आदीं काही समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत व स्वाक्षरी ने मा. उपविभागीय अधिकारी व मा.तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदनात एकूण 17 समस्यांचा उल्लेख करून देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post