डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे भाजीपाला संकलन व खरेदी केंद्राचे शुभारंभ II शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट जाणार मुंबई च्या बाजारपेठेत



पालघर (निलेश कासट ):- 

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, लुपिन फाउंडेशन तारापूर व कृषी विभाग डहाणू यांच्या संयुक्त प्रयत्नाने मौजे धनिवरी परिसरामध्ये आदिवासीं शेतकऱ्यांना एकत्र करून महालक्ष्मी गड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी* स्थापन करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत ५२४  सभासद कंपनी ला जोडले गेलेले आहेत. महालक्ष्मी गड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून चारोटी,ओसरवीरा , गंजाड , रानशेत धानिवरी परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट मार्केट पर्यंत पोहोचणे व शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या हेतूने शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मौजे धानी वरी गावांमध्ये भाजीपाला संकलन व खरेदी केंद्राचे शुभारंभ पालघर मतदार संघाचे  आमदार श्री. श्रीनिवास वनगा व काशिनाथ .तरकसे साहेब, जिल्हा कृषी अधीक्षक पालघर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाबार्डचे डिस्टिक मॅनेजर श्री किशोर पडघम यांनी महालक्ष्मी गड फार्म प्रोड्युसर कंपनी ला नाबार्डचे वतीने करण्यात आलेल्या  योगदाना बाबत माहिती दिली.


तालुका कृषी अधिकारी श्री संतोष पवार साहेब यांनी महालक्ष्मी गड च्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कृषी विभागाचे योजनेबाबत जिल्हा कृषी अधिकारी यांनी  शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्तावना प्रकल्प व्यवस्थापक लुपिन फाऊंडेशनचे श्री एन एस पठाण यांनी केले.महालक्ष्मी गड कंपनीचे संचालक श्री नामदेव तांबडा यांनी आभार मानले.



Post a Comment

Previous Post Next Post