पालघर (निलेश कासट ):-
पालघर जिल्ह्यातील मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय
महामार्गावरील दुर्वेस-साये येथे १४ फेब्रुवारी रोजी रात्री च्या ९ च्या सुमारास
एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नर जातीच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला .दहिसर
तर्फे मनोर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्याला
ताब्यात घेतले आहे.पुढील तपासणी वनविभागाचे अधिकारी करत आहेत .
Post a Comment