याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, वडवली येथे कोणार्क सॉलीटेअर नामक गृहप्रकल्प उभा राहत असून त्यामध्ये १२ मजली इमारती बांधण्यात येत आहेत. पैकी तीन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांचा निवासी वापर देखील सुरु झाला आहे. त्यालगतच असलेल्या चौथ्या इमारतीचे बांधकाम सुरु असून सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काही मजूर सदर इमारतीच्या १२ व्या मजल्यावर प्लाय काढण्याचे काम करत होते. त्यावेळी अशोक कुमार यादव (मूळ रा. उत्तरप्रदेश ) नामक मजूर डकमधून खाली जमिनीवर पडला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बांधकाम कंत्राटदार शरीफ शब्बीर बेग (४६) याने घटनास्थळी धाव घेतली.
प्रकरणी विरेंद्रकुमार राजनाथराम कुमार या मजुराने दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि. ३०४ (अ) ३४ नुसार बांधकाम कंत्राटदार शरीफ शब्बीर बेग (वय-४६) व कोणार्क सॉलीटेअरचे बिल्डर विकासक अशा दोघांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे करीत आहेत.
Post a Comment