तलासरी तालुक्यात पुर्वी प्रमाणे बस सेवा सुरु करण्यास माननीय सभापतींची मांगणी.


पालघर (निलेश कासट ):- 

तलासरी तालुक्यातील ग्रामस्थांना तालुकाच्या ठिकाणी जायचं असल्यास बस सेवा उपलब्ध नसल्याने पायी किंवा ज्यादा पैसे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करून तालुक्याचा ठिकाणी जावे लागत असे तसेच माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा चालू झाले असून उधवा-कोदाड-कळमदेवी-तलासरी-उंबरगाव-आंबेसरी-करजगाव-आमगाव-डोंगरी-संजान या परिसरातील विद्यार्थांना तसेच रोजंदारीसाठी कामावर जाणार्या मजुरांना पायी किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.

या देनंदिन अडचणीला मात करण्यासाठी तालुक्यात पूर्वी प्रमाणे १००% नियमित बस फेर्या त्वरित चालू करण्यात यावेत त्या अनुसंगाने पंचायत समिती तलासरी सभापती कोम्रेड नंदकुमार हाडळ साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य कॉम्रेड अक्षय दवणेकर  यांनी निवेदन दिले व तलासरी बस स्टँडची पाहणी करत अपूर्ण सोयी सुविधांची पूर्तता करण्याची हमी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post