डोंबिवली ( शंकर जाधव )
दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे रायगड जिल्ह्यातील सुरगड ह्या किल्ल्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. मागील १० वर्ष गडावर श्रमदानाच काम चालू आहे.ह्या मोहिमेत किल्ल्यावरील उखळ्या बुरुजा जवळील पाण्याच्या टाक्याची स्वश्चाता मोहीम हरण्यात आली आहे, बुरजाचे बांधणीतील दगड निसटून बुरुजच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाक्यात पडलेले दगड उचलण्याच्या जाळीच्या साहाय्याने उचलून व्यवस्थित एका ठिकाणी रचून ठेवण्यात आले. भविष्यात आम्हा दुर्गवीरांना ह्या बुरुजाचे काम करून ते दगड परत त्या बुरुजावर रचायचे आहेत आणि त्या बुरुजला नवसंजीवनी देण्याचे आम्हा दुर्गविरांचा मानस असल्याची माहिती दुर्गवीर प्रतिष्ठानचे
प्रशांत वाघरे यांनी दिली.ह्या मोहिमेत एकूण 30 सभासदांनी सहभाग घेतला.
Post a Comment