खदानीत पोहण्यासाठी गेलेले दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तिघांना वाचविण्यास अग्निशामक दलाल यश...भोपर गावातील घटना...



डोंबिवली ( शंकर जाधव ) 

 डोंबिवली जवळील असणाऱ्या भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत  पोहण्यासाठी गेलेल्या सहा जणांपैकी दोघा अल्पवयीन मुलांचा बुडून मुत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भोपर गावातील खदाणीत घडली.चार जणांना वाचविण्यास यश आले असून पोलीस व गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते.


     आयरे गावातील सहा मित्र पोहायला गेले होते. दरम्यान खदानीच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडायला लागलेली चार मित्रांना वाचवण्यात अग्निशमन दल आणि गावकऱ्यांना यश आले असले तरी दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

     आयुष केदारे (13)  तर दुसऱ्याचे नावही आयुष असल्याचे समजते आहे. या खदानीमध्ये बुडून मृत्य झाल्याची ही दुसरी घटना असून मागच्यावेळी पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी गलेल्या एकाच घरातील पाच जणांचा मृत्य झाला होता. मात्र आज पोहायला गेलेल्या मित्रांचा बुडतानाचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी खदानी जवळ धाव घेत यातील चार मुलांचा जीव वाचवला.  मात्र मागच्यावेळी या खदानी जवळ जाऊ नये यासाठी  सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले होते.  दरम्यान खदानीत पोचण्यास जाऊ नये म्हणून गावकऱ्यांनी खबरदारी घेत काही खदानी बाहेर पोहण्यास बंदी असे फलक लावले होते.दरम्यान खदान बुजवावि अशी मागणी गावकरी करत आहे.

 अतुल अवटे१७, कीर्तन म्हात्रे१३, पवन चव्हाण११, परमेश्वर घोडके १२ यांना वाचवण्यात यश आले तर  आयुष केदारे १५, आयुष यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post