आमदार विशवनाथ भोईर यांच्या हस्ते बल्याणी रस्त्याचे भूमिपूजन
टिटवाळा- बल्याणी टिटवाळा हा महत्त्वाचा रस्ता आहे परंतु हया रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती, नगरसेविका नमिता पाटील यांनी नविन रस्ता बनविण्यासाठी महापालिका प्रशासना कडे पाठपुरावा केला होता. सन 2017/18,च्या अंदाजपत्रकात तरतुदी करून 9,कोटी24,लाख रुपये मंजूर केले होते, परंतु पुढे लगेच कोरोना आजाराचे सावट आले, व महापालिकेच्या सवौच कामांना स्थगिती देण्यात आली, परंतु आता कोरोना आजाराचे सावट कमी झाले आहेत, त्या मुळे महापालिका प्रशासनाने कामे सुरू केली आहेत, तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विशवनाथ भोईर नगरसेविका नमिता पाटील यांनी सातत्याने महापालिका प्रशासना कडे पाठपुरावा करून रस्ता साठी निधी मंजूर करून घेतला,
आमदार विशवनाथ भोईर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात श्रीफळ वाढवून रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले, यावेळी माजी नगरसेविका नमिता पाटील, कूषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, पोलीस पाटील आनंता पाटील, एकनाथ पवार, विनोद शिंदे यांच्या सह आदीजण उपस्थित होते,
यावेळी आमदार विशवनाथ भोईर यांनी सांगितले की काही लोकांना श्रेय घेण्याची सवय असते, काम कोण करतो हे बघीतले पाहिजे, सातत्याने नगरसेविका नमिता पाटील व मयूर पाटील यांनी महापालिका प्रशासनाना कडे पाठपुरावा केला आहे, तसेच भौगोलिक दृष्ट्या हा परिसर मोठा आहे त्यामुळे मी आमदार निधी हि दिला आहे, बल्याणी परिसराचा कायापालट होईल असे सांगितले.
Post a Comment