बसपा महाराष्ट्र प्रदेश सचिव  सुनील खांबे यांच्या कार्यालयावरील  भ्याड हल्ल्याच्या निषेधार्त ठाण्यात मोर्चा

(मुंबई डेटलाईन24 ठाणे प्रतिनिधी- गणेश खरात) 

 मराठा समाजाच्या वतीने ठाण्यात  ज्या दिवशी बंद पुकारुन मोर्चा काढण्यात आला होता . त्या दिवशी ठाण्यातील डॉ. बाबासाहेब रोड या ठिकाणावरुन मोर्चा जात असताना काही समाजकंटकांनी बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील खांबे यांच्या कार्यालयावर दगडफेक करुन तोडफोड केली होती. त्याच्या निषेधार्थ  ठाणे रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब पुतळा ते कोर्टनाका असे आज एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्च्यात येथील बहुजन समाज मोठ्या संख्येने  सहभागी झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post