टिटवाळा डॉक्टर वेलफेअर फाऊंडेशन व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्तविद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न
(टिटवाळा - मुंबई डेटलाईन 24) आजच्या काळात विज्ञानाने बरेच चमत्कार आपल्याला दाखवले आहेत.अनेक असाध्य गोष्टी साध्य करून विज्ञान नेहमीच आपल्याला थक्क करत आले आहे.परंतु आजवर आपणास कृत्रीम रक्ताची निर्मिती करण्यात यश आलेले नाही. म्हणूनच समाजातील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांना आवाहन करत आज टिटवाळा डॉक्टर वेलफेअर फाऊडेशन व रेड स्वस्तिक सोसायटी, ठाणे जिल्हा याच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीराचे सकाळी ९ ते संध्या ४ या वेळात विद्यामंदिर शाळा,टिटवाळा पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरास १०२ रक्तदात्यांनी आपले अर्ज भरले तर त्यापैकी ७५ रक्तदात्यांकडून रक्त जमा करण्यात आले.ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे पारणं फेडण्याची संधी म्हणजे रक्तदान या उद्देशाने भविष्यात ६ महिन्यातून एकदा सर्वांच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे प्रयत्न असेल असे डॉ योगेश कवठे(अध्यक्ष),टिटवाळा डॉक्टर वेलफेअर फाऊंडेशन व प्रमोद नांदगावकर(राज्य जनसंपर्क संचालक)रेड स्वस्तिक सोसायटी, महाराष्ट्र राज्य.यांनी सांगितले.
या शिबिराचे उदघान टिटवाळा पोलिस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक केशव नाईक,कल्याण तालुका पोलीस स्टेशन,टिटवाळा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व गणेशपुजन करुन करण्यात आले.या शिबिरास उपेक्षा भोईर(उपमहापौर) क डो म पालिका,अपेक्षाताई जाधव(नगरसेविका),सुरेश भोईर (माजी नगरसेवक),राजाभाऊ पातकर,शक्तिवान भोईर,अनिल महाजन,बंदेश जाधव,मिलिंद सावंत,राजेश दीक्षित,अनिल फड,संतोष दीक्षित,गणेश पाटील,विनोद साडविलकर,प्रभाकर भोईर,सुब्बाराव खराडे, सुरेंद्र साळवी,विनायक कोळी, दिलीप राठोड, आनंद कासवेकर,कल्पेश पाटील,सागर मोरे, राममूर्ती वर्मा,मंगेश देशमुख, सिद्धू पुजारी,राजेश भगत,राजेश तरे इ मान्यवरांनी उपस्थिती लावली.शिबिर यशस्वी करण्यास टिटवाळा डॉक्टर वेलफेअर फ़ाऊडेशन चे डॉ भारत बिरादार, डॉ जयेंद्र खारीक,डॉ अमोल धानके,डॉ रमेश तिवारी,डॉ रवींद्र पाटील, डॉ आरती नाईक मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर चे डॉ केंद्रे सर व त्यांची संपूर्ण टीम,विद्यामंदिर शाळाचे सुरोशी सर व त्याचे सहकारी यांचे सहकार्य लागले तसेच टिटवाळा युथ चे सर्व सदस्य, अतुल शिंपी ,नंदू गावंडे यांनी हे शिबीर संपन्न करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment